महिंद्रा एक्सयुव्ही ७०० व ह्युंदाई क्रेटा गाड्यांची तोडफोड.
चाकण प्रतिनिधी दि. २७ –
चुलत नातवाकडून आजोबांच्या घरासमोरील रात्री-अपरात्री येऊन दोन महागड्या गाड्या फोडून आजोबाच्या दिशेने पिस्तूल रोखत गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना ही मोई (ता. खेड) येथे घडल्याची समोर आली आहे. सदर आरोपींवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Attempt to murder
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित शेत जमिनीच्या कारणावरून दि.२६ जूनच्या मध्यरात्री १ वाजता सुमारास फिर्यादी सुरेश विष्णू गवारी (वय ६० वर्षे, रा.मोई, ता.खेड, जि.पुणे) यांच्या मुक्ताई मंदिराशेजारील घरात कुटुंबासह झोपले होते. आरोपी आशिष नंदू गवारी (वय २१ वर्षे, रा. बिजलीनगर झोपडपट्टी वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) याने आपल्या २० ते ३० वयोगटातील चार मित्रांसोबत सोबत (नावे माहित नाही) आला. घरामसमोरील फिर्यादीच्या मालकीच्या असणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० (क्र. एम एच १४ एल एल २४२४) आणि ह्युंदाई क्रेटा (क्र. एम एच १४ एल एक्स २४२४) या दोन महागड्या चारचाकी वाहनांची चार साथीदारांसह दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर आरोपी आशिषने फिर्यादीच्या दिशेने पिस्तुल रोखत गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. Attempt to murder
विविध कलमान्वये गुन्हे दाखल.
याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १०९, ३२४(५), १८९(४), १९०, १९१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यबरोबर शस्त्र अधिनियम कायदा कलम ३(२५) (२७) क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७, तसेच मपोका ३७(१) (३) सह १३५ अन्वये गन्हा दाखल केला आहे. Attempt to murder
घटनास्थळी पोलिसांची पाहणी.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) श्रीमती श्वेता खेडकर, महाळुंगे विभागाचे सपोआ सचिन कदम आणि गुन्हे-२ चे सपोआ प्रवीण मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. Attempt to murder
