डिजेसह पोलिसांकडून गाडी जप्त.

चाकण प्रतिनिधी दि. २० :
खेड तालुक्यातील कुरुळी गावाच्या हद्दीत सनी कंपनीकडून निघोजे गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर नियम धाब्यावर ठेवून डीजे वाजवल्याने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मौजे कुरुळी (ता. खेड) गावाच्या हद्दीत सॅनी कंपनीकडून निघोजेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरील सॅनी चौकातील अॅक्युरुब क्रॉपटेक कंपनीत डिजे वाजविला. आरोपीने पोलिसांच्या कायदेशीर आदेशांची अहवेलना करून उल्लंघन करत डीजे सुरुच ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३, २७०, २९३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६/१३४, ३७(१)(i)/१३५(i), ३८(अ ) (i)/१३६ अन्वये गुन्हा दाखल करुन डीजे व गाडी जप्त केली.
गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव.
सुधीर तुकाराम दरेकर (वय वर्षे, रा. सुम्ब्रेनगर, वाकी खुर्द, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील धोंडिराम बनकर (वय ४० वर्षे), नेमणूक – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांची कारवाई
सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक पिंजारी आणि पोलीस उपनिरीक्षक मोगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करे करत आहेत.
हे ही पहा.
शिरूर तालुक्यात 24 तासात दोन मोठ्या घटना.! आधी गोळीबारातून एकाची हत्या तर – रांजणगावात कोयत्यानं दोघांवर जीवघेणा हल्ला.



