Friday, November 13, 2026
spot_img
Home शैक्षणिक PHD : खालुंब्रे गावाचे अतुल पवार यांची पी.एच.डी.ला गवसणी.

PHD : खालुंब्रे गावाचे अतुल पवार यांची पी.एच.डी.ला गवसणी.

0
11
PHD
PHD

संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी. PHD

PHD

चाकण प्रतिनिधी दि. २ –

खालुंब्रे (ता. खेड) येथील प्रा. अतुल पवार यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात पी.एच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पवार यांच्या यशामुळे खालुंब्रे गावासह संपूर्ण खेड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रा. अतुल पवार हे खालुंब्रे गावाचे माजी सरपंच व खेड कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे माजी संचालक मा. गुलाबराव पवार यांचे सुपुत्र आणि खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोलदादा पवार यांचे लहान बंधू आहेत. PHD

• शैक्षणिक पात्रता.

प्रा. अतुल पवार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा खालुंब्रे येथे तर माध्यमिक शिक्षण संत तुकाराम विद्यालय देहु येथे झाले. त्यानंतर डिप्लोमाचे शिक्षण नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निक, तळेगाव दाभाडे येथे घेतले आहे. त्याचबरोबर B.Tech व M.Tech चे Information Technology चे शिक्षण महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) कोथरूड येथून पूर्ण केले आहे. PHD

• आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव.

पीएच.डी.च्या संशोधन प्रवासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या संशोधन कार्याचे दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये (International Conferences) सादरीकरण व प्रकाशन झाले असून, एका आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये (International Journal) त्यांचा संशोधन लेखही प्रकाशित झाला आहे. याशिवाय त्यांच्या संशोधनातून एका पेटंटचीही नोंद झाली आहे. ही कामगिरी त्यांच्या संशोधनातील सातत्य, मेहनत आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारी आहे.

प्रा. अतुल पवार हे गेल्या १६ वर्षांपासून निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (PCCOE) संगणक विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. PHD

• वरिष्ठाचे मोलाचे सहकार्य.

या संपूर्ण संशोधन प्रवासात त्यांना पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. नरेंद्र कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संगणक विभागप्रमुख डॉ. सोनाली डी. पाटील, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. के. राजेश्वरी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, PCET ट्रस्टचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.

ग्रामीण भागातून पुढे येत उच्च शिक्षण, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या प्रा. अतुल पवार यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. PHD

माझ्या यशामागे कुटुंबीयांचा मोठा वाटा असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच पीएच.डी.चे स्वप्न साकार करता आले आहे.

♦ प्रा. अतुल पवार. ♦

हे ही पहा. 

रस्ता दुरुस्तीबाबत प्रशासनाचे पितळ उघडे.

https://youtube.com/shorts/MakQyg98sOc?feature=share

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here