महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बारा तासात केले अटक.
चाकण प्रतिनिधी दि. २७ –
मोई (ता.खेड) येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या कारणावरून दि.२६ जूनच्या मध्यरात्री फिर्यादी सुरेश विष्णू गवारी हे मुक्ताई मंदिराशेजारील घरात कुटुंबासह झोपले होते. आरोपी आशिष नंदू गवारी हा आपल्या चार मित्रांसोबत आला. फिर्यादीच्या घरासमोरील मालकीच्या असणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० आणि ह्युंदाई क्रेटा या दोन महागड्या चारचाकी वाहनांची दगडफेक करून तोडफोड केली होती. त्यानंतर आरोपी आशिषने फिर्यादी आजोबाच्या दिशेने पिस्तुल रोखत गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत सुरेश गवारी यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. अखेर पोलिसांनी अवघ्या बारा तासात मुख्य आरोपीसह चार हल्लेखोरांना अटक केली.
विविध कलमान्वये गुन्हे दाखल.
याबाबत सुरेश गवारी यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा रजि. क्रमांक ५७०/२०२६, बीएनएस कलम १०९, ३२४(५),३५२, १८९ (४),१९०,१९१(३) ३(५) शस्त्र अधिनियम कायदा कलम ३ (२५) (२७), सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ तसेच मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mahalungemidcpolice
आरोपींचे आणखी एक कांड उघडकीस.
गोळीबारचा गुन्हा केल्यानंतर पाचही आरोपी हे भांगरे वस्ती, वराळे रोड, महाळुंगे (ता.खेड) येथील किराणा मालाच्या दुकानदाराला पिस्तूलाचा धाक दाखवुन जबरदस्तीने पैसे उकळले. तेथून फरार झाले. याबाबत दुकानदाराने दि. २६ जून रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ५७१/२०२६ बी एन एस कलम ३१० (२), ३३२ (ख), ३२४(२), ३५१(२), ३(५) आर्म अॅ क्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा ही उघडकीस आला. Mahalungemidcpolice
संयुक्त कारवाईतून आरोपींना अटक.
दाखल गुन्हयातील गांभिर्य लक्षात घेता, परिमंडळ ४ चे मा. पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, महाळुंगे विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दक्षिण महाळुंगे व उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनचे पथके तयार करुन आरोपींचे शोधकामी रवाना करण्यात आली होती. तेव्हा पथकांनी हल्लेखोरांचा अत्यंत कौशल्यपूर्वक शोध घेऊन संयुक्त कारवाई करत हल्लेखोरांना १२ तासांच्या आतमध्ये शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्हयात वापरलेले पिस्तूल व रिक्षा असा ऐवज जप्त करण्यात आला. या हल्लेखोरांपैकी एक विधीसंघर्षीत बालक सुद्धा आहे. Mahalungemidcpolice
गुन्ह्यातील आरोपीची नावे.
१) आनंद गौरव कांबळे वय २० वर्षे, रा. दत्तनगर, चिंचवड पुणे,
२) आशिष नंदु गवारे वय २१ वर्षे रा. चिंचवडेनगर, चिंचवड पुणे,
३) अर्जुन बळीराम पात्रे यय २७ वर्षे रा. चिंचवड पुणे,
४) गणेश सोमनाथ पात्रे वय २१ वर्षे, रा. विदयानगर, चिंचवड पुणे,
५) विधीसंघर्षीत बालक.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, मा. पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिल देवडे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुले, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मोगले, पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी, पोलीस उपनिरीक्षक डोंगळे, पोलीस अंमलदार, मंगेश सावंत, नरहरी नाणेकर, युवराज बिराजदार, अमोल बोराटे, संतोष काळे, राजकुमार हनुमंते, महेश गायकवाड, राजेश गिरी, आकाश घाडगे, सुनिल बनकर, सोमनाथ गायकवाड, मंगेश कदम, साहिल सांडभोर, मंगेश घोलप, शुभम खंडागळे यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मोगले हे करीत आहेत. Mahalungemidcpolice
