Homeक्राईमCrime : करंजविहीरे येथे वृद्ध महिलेचा गळा दाबून खून

Crime : करंजविहीरे येथे वृद्ध महिलेचा गळा दाबून खून

दोन ग्रॅम सोन्याच्या दागिण्यासाठी वृद्धेचा खून.

चाकण दि.११ : फक्त दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना ही करंजविहिरे (ता.खेड) येथे उघडकीस आली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह प्लास्टिक गोणीत भरून भामानदी पात्रात फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला.

सिंधुबाई विठोबा मरगज (वय – ८० वर्षे , रा. करंजविहीरे, ता.खेड जि.पुणे) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. समीर बाळू मरगज (वय – २७ वर्षे) यांनी याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी कैलास कुंडलिक मरगज (वय ३६, रा. करंजविहिरे ता. खेड जि. पुणे) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजविहीरे येथील मरगज वस्तीवर राहणाऱ्या मयत सिंधुबाई विठोबा मरगज या शनिवारी (दि.२ मे) रात्री आठच्या सुमारास वस्तीवरील पानंद रस्त्याने जात होत्या. यावेळी आरोपी कैलास मरगज याने महिलेला अडवले. अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याच्या उद्देशाने आरोपीने मयत यांचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपी कैलास याने वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत भरून करंजविहीरे ते धामणे रस्त्यावरील भामा नदीच्या पुलावरून नदी पात्रात फेकून दिला. 

अवघ्या दोन ग्रॅम सोन्यासाठी वृद्ध महिलेची अमानुष हत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच संतापाचे वातावरण आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments