Homeलोकल न्यूजChakanmidc : चाकण एमआयडीसीतील सार्वजनिक वाहतूक संदर्भात बैठक संपन्न.

Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील सार्वजनिक वाहतूक संदर्भात बैठक संपन्न.

पीएमपीएमएल व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांची संयुक्त बैठक.

चाकण दि.१२ – चाकण औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्र.२ मधील कामगारांना अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या अभावामुळे कामगारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते. तसेच मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व शाश्वत उपाय शोधण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक चाकण एमआयडीसी फेज-२, वासुली (ता.खेड) येथे पार पडली.  

चाकण एमआयडीसी फेज-२ मधील बस जोडणीतील सध्याच्या त्रुटींचे मूल्यांकन, नवीन मार्गांचा शोध, शिफ्टच्या वेळेत बस फेऱ्या वाढवणे. तसेच कामगारांसाठी लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी सुधारणे. अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. ह्या टप्प्यात कामगारांची गतिशीलता आणि औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीची तातडीची गरज आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे हजारो कामगार व उद्योगांवर थेट परिणाम होत आहे. तेव्हा पीएमपीएमएल प्रशासनाने प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित व्यावहारिक पावले उचलावीत. अशी विनंती फेडरेशनमार्फत दिलीप बटवाल यांनी अधिकाऱ्यांना केली.  

या बैठकीस पीएमपीएमएलचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, भोसरी डेपो व्यवस्थापक अशोक साबळे, मुख्यालय प्रमुख रामदास विरनक, निगडी डेपो एडीएम मच्छिंद्र तितकरे, नियोजन विभाग स्वारगेट डेपो नवनाथ बधे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज सीईओ दिलीप बटवाल व उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments