अभिनव उपक्रमाची चर्चा.

चाकण प्रतिनिधी दि. २९ –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खराबवाडी (ता.खेड) येथील आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर मोकाशी यांनी स्वतःच्या वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना वही वाटप करून ज्ञानदानाचे काम केल्याची चर्चा समाजामध्ये होत आहे. shala

दरवर्षी मोकाशी सर हे आपल्या वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना वही वाटपाचा अभिनव उपक्रम राबवून आदर्श निर्माण करीत आहेत. सरांनी तब्बल १३०० विदयार्थ्यांना वही वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. shala

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन धाडगे, उपाध्यक्ष अमर वाघ, सदस्य तेजस वाडेकर, मुख्याध्यापक अमोल भगतसिंग भाटी, प्रताप चिंधू आडेकर, संतोष मोहन भूते, धनंजय लिंबाजी केंगले, नितीन आडवळे, तुकाराम शिंदे, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. Shala