आयुक्त तुकाराम मुंडेंच्या भीतीपोटी फेकून दिल्याची चर्चा.
चाकण प्रतिनिधी दि. ३० –
खेड तालुक्यातील तुकाईवाडी गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील नवीन बाह्यवळणालगत बनावट व भेसळयुक्त दूध, पनीर व आमरस फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Tukarmammunde
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाईवाडी गावाच्या हद्दीत पुणे–नाशिक महामार्गावरील नवीन बायपासलगत नामांकित दूध ब्रँडच्या पाकीटबंद दूधाच्या पिशव्या अज्ञात व्यक्तींकडून बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अमूल, गोकुळ, चितळे ह्या नामांकित दूध ब्रँडच्या भेसळयुक्त पिशव्या आहेत. त्याचबरोबर बनावट पनीर व आमरस ही फेकून दिला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे दूध, पनीर व आमरस यांचा परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरला होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन परिसरातील विहिरीमध्ये मिसळल्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. Tukarammunde
घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे व सदस्या दिप्ती भोगाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना दूध, पनीर व आमरस यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. नागरिकांकडून भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. Tukarammunde
तुकाराम मुंडेंच्या कारवाईची घेतली धास्ती.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे राज्यभर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दाणाणले आहेत. याचीच धास्ती घेत खेड जवळील बाह्यवळणालगत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ फेकून दिल्याची चर्चा होत आहे. Tukarammunde

हे वाचा.