तब्बल आठ वर्षानंतर आरोपीला शिक्षा. POLICEAWARD

चाकण प्रतिनिधी दि.१८ –
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक ढमाळ यांना पुरस्कार देवून सन्मानित केले. नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना ६ ऑगस्ट २०१८ रोजी कालिकानगर येथील तिहेरी खुनाचे हत्याकांड घडले होते. ह्या गुन्ह्याचा कौशल्यपणाने तपास करून आरोपीला अटक केली होती. गुन्ह्यातील आरोपीला नुकतीच मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. POLICEAWARD
नेमकी घटना काय होती?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील पंचवटीतील मायको दवाखान्याजवळ ६ ऑगस्ट २०१८ रोजी पहाटे ही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. संगीता सुरेश देवरे यांना आरोपी जलालउद्दीन अलीमोहम्मद अमिल ऊर्फ खानसाहेब (रा. फुलेनगर झोपडपट्टी, पंचवटी) याने ‘मै यहाँ से जाऊंगा नही, जाऊंगा तो तुझे और तेरे परिवार को जिंदा जलाके मारके ही जाऊंगा’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने पेट्रोलपंपावरून डिझेल आणून संगीता देवरे (वय ३८ वर्षे) व यांची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे (वय २० वर्षे) आणि नात सिद्धी रामेश्वर शेंडगे (९ महिने) या झोपेत असताना त्यांच्या अंगावर डिझेल टाकून जिवंत जाळले. या घटनेत अधिक भाजल्याने तिघींचाही मृत्यू झाला होता. खूनानंतर आरोपी मूळ गावी फरार झाला होता. रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपी पकडण्यात आले. मात्र, तो बेड्यांसह पळून गेला होता. त्याला नाशिक शहर गुन्हे शाखेने शिताफीने पकडले. POLICEAWARD
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ, व्ही. डी. शार्दुल यांनी केला होता. या खटल्यात उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, मधुकर पिंगळे, मनोहर खंबाईत, विक्रांत नागरे, रशिद शेख आणि तनजीम खान यांनीही पाठपुरावा केला. POLICEAWARD
आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा.
विविध कलमांतर्गत आरोपी विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे लिना चव्हाण आणि अनिल बागले या वकिलांनी युक्तिवाद केला. तिहेरी हत्याकांड आणि जाळपोळ प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. भन्साळी यांनी १४ जुलै २०२६ (गुरुवारी) रोजी आरोपीला “मरेपर्यंत फाशी”ची शिक्षा सुनावली. तब्बल आठ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. POLICEAWARD
