Homeलोकल न्यूजPMRDA : मोई येथे पीएमआरडीएकडून ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त.

PMRDA : मोई येथे पीएमआरडीएकडून ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त.

३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त. PMRDA

Pmrda

चाकण प्रतिनिधी दि.१६ –

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून मोई (ता.खेड) येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले असून, त्यामुळे अनधिकृत पत्राशेडधारक आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. PMRDA

Pmrda

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी ही धडक मोहीम राबविण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत चोख आणि सूक्ष्म नियोजन केले होते. PMRDA

कारवाई दरम्यान प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामध्ये १ हजारहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, एमएसएफ जवान आणि सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यासह ही कारवाई पार पडली. पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड पोलीस, महावितरण, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. PMRDA

Pmrda

पीएमआरडीएच्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड किंवा बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. आगामी काळातही ही कडक कारवाई अशीच सुरू राहील.

– डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments