दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची कारवाई.
चाकण प्रतिनिधी दि. ५ –
मयत व्यक्तीने आपला मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन आरोपीने खून केल्याची घटना मोई (ता.खेड) येथे घडल्याची उघडकीस आली आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आहे. Murder
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०२ जुलै रोजी रात्री १० वाजता ११२ नंबर वर कॉल आला. की, निघोजे मोई रोडवरील मोई गावाच्या हद्दीतील गुरुकृपा हौसींग सोसायटी मधील बंडु भगवान बुरुले यांच्या मालकीच्या विट बांधकाम असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एक कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. सदर ठिकाणी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. Murder
मृतदेह कोणाचा?
चौकशी केली असता मयत व्यक्तीचे नाव चाँद याकुब शेख, (वय ४२ वर्षे, रा. केशवनगर, चिखली, पुणे) असे असल्याचे समजले. मृतकाची पत्नी शेजनाज चाँद शेख यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीवरुन मयत याने आरोपीचा मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५८७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Murder
आरोपी नाव काय?
आरोपीचे नाव हिरालाल सुभाषचंद्र गौतम, (वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.मोई ता.खेड, जि.पुणे. मुळ रा.ग्राम नागला खादर, पो. बाकेवर, ता. भरताना, जि. ईटावा, राज्य उत्तरप्रदेश) असे आहे. Murder
आरोपीचा शोध कसा घेतला.
पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयामधील साक्षीदार याच्याकडे अधिक विचारपुस केली असता अशी माहिती समोर आली. मयत चाँद शेख हा आरोपी हिरालाल सुभाष गौतम याच्यासोबत राहत होता. हिरालाल गौतम हा मागील दोन दिवसापासुन फरार आहे असे तपासात निष्पन्न झाले. हिरालाल गौतम याचा शोध हा साक्षीदार व तांत्रिक विश्लेषणा व्दारे मिळालेल्या माहितीवरुन घेतला. तेव्हा आरोपी हा वाघोली, केसनंद परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे पोलिस हवालदार बिराजदार, पोलीस शिपाई गिरी यांना घेऊन तात्काळ वाघोली, केसनंद या ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेवुन त्यास २४ तासाच्या आत मध्ये शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने दिनांक २९ जून रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान मयत चाँद याकुब शेख याने त्याचा (आरोपीचा) मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले. अशी कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. Murder
पोलिसांची दमदार कामागिरी.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहा.पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोउपनि संतोष जायभाये, पोलीस अंमलदार चेतन सावंत, नरहरी नाणेकर, युवराज बिराजदार, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, आकाश घाडगे, शिवाजी मरकड यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे हे करीत आहेत. Murder
