HomeBlog#Illegal liquor : हातभट्टी दारू अड्ड्यांची माहिती द्या, अन्यथा कडक कारवाई होणार...

#Illegal liquor : हातभट्टी दारू अड्ड्यांची माहिती द्या, अन्यथा कडक कारवाई होणार – गजानन पाटील.

राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडवर.

चाकण प्रतिनिधी दि. १० –

पुणे जिल्ह्यातील बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती करणारे दारू अड्डे आणि विक्री केंद्रांची माहिती द्या. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा. असे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना सक्त आदेश दिले आहेत.

गावातील हातभट्टी दारूचे अड्डे, गुळ व्यापारी, कच्चा माल पुरवठादार आणि संबंधित गुन्हेगारांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणे, सहकार्य करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत परवानगीशिवाय दारू तयार करणे, वाहतूक करणे, विक्री करणे किंवा साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांमध्ये सहभागी आढळणाऱ्यांना ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिने ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

विशेष म्हणजे, अधिनियमाच्या कलम १३४ नुसार गावातील बेकायदेशीर दारू व्यवसायाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे असतानाही ती लपविणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटीलांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

* पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारुमुळे मृत्यू.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हातभट्टी अड्डयावरील विषारी दारू पिल्याने १८ ते २२ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ज़िल्हामध्ये कारवाई करून दारूचे अड्डे उध्वस्त केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments