Homeलोकल न्यूजChakanmidc : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे गावातील पूल वाहतुकीस बंद. 

Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे गावातील पूल वाहतुकीस बंद. 

७ जुलै पासून १४ जुलैपर्यंत पूल बंद. 
चाकण प्रतिनिधी दि.७ –

चाकण एमआयडीसीतील महाळुंगे (ता.खेड) येथील पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसीत झालेल्या प्रचंड प्रमाणात पावसामुळे महाळुंगे येथील ओढ्यावरील पुलाशेजारील भराव हा वाहून गेला आहे. तेव्हा तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळील (सा. क्र. कि.मी १७/१५०) पुलाचा भराव हा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने पुल वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे. तेव्हा धोका वाढण्याची शक्यता असल्याने पुलावरील सर्व प्रकारची वाहतुक पूर्णपणे मंगळवार (दि.७) रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. सदर पूल हा ७ जुलै रात्री १२ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. Chakanmidc

एचपी चौक ते पोलीस स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.

खालील पर्यायी मार्गांचा वापर.

१. चाकणकडे जाणारी वाहतुक एचपी चौक ते इंड्यूरन्स चौक ते सिग्मा ते व्ही. डब्लु कॉर्नर ते एआरएआई चौक ते स्पायसर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

२. महिंद्रा, तळवडे कडे जाणारी वाहतुक एच. पी चौक ते इंड्युरन्स चौक ते सिग्मा ते व्ही. डब्लु कॉर्नर ते महिंद्रा सर्कल चौक मार्गे इच्छित स्थिळी जातील. Chakanmidc

* चाकण चौक ते एच. पी चौक जाणारे सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.

१. चाकण ते एच. पी चौक जाणारी वाहतुक वाघजाईनगर ते बिरदवाडी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

२. चाकण ते एच. पी चौक जाणारी वाहतुक महाळुंगे गाव कमान ते आंबेठाण/बिरदवडी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. Chakanmidc

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments