पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना फायदा. STBus

ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांसाठी एसटी बसच्या अर्धे तिकिटासाठी एनसीएमसी स्मार्टकार्ड नोंदणी कॅम्पचे बोरादरा ग्रामपंचायतीच्या सदस्या रोहिणी सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतून आयोजन केले होते. STBus
२०० ते ३०० प्रवाशांनी घेतला लाभ.
पश्चिम पट्ट्यातील कोळीये, गडद, वहागाव, बोरदरा आणि करंजविहिरे या गावांमध्ये आयोजन करण्यात आले होते. सदरील कॅम्पला महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०० ते ३०० प्रवाशांनी सदर योजनेचा लाभ घेतला. पश्चिम पट्ट्यातील दुर्गम गावातील नागरिकांना या कॅम्पचा फायदा होणार आहे. STBus

१ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ.
एसटी बसच्या प्रवाशांच् लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (NCMC) या स्मार्टकार्डची सक्ती करण्यात आली आहे. शासनाने याची अंतिम मुदत १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. तेव्हा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी हे कार्ड असणे बंधनकारक करण्यात आल्याने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. STBus

NCMC कार्ड काढण्याचा कॅम्प घेण्याचे कारण असे आहे, की ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना स्मार्टकार्ड काढण्यासाठी बाहेर जाणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन कॅम्पचे शिबिर घेण्याचा संकल्प आहे. अशी माहिती रोहिणी पडवळ यांनी दिली. STBus
हे ही पहा.
वाघजाईनगर रस्त्याची चाळण; खड्ड्यांतून #लोखंडी सळ्या बाहेर, वाहनचालकांचा #जीव टांगणीला.












