Homeक्राईम#Suicide : आश्रम शाळेत १५ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या.

#Suicide : आश्रम शाळेत १५ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला धक्कादायक घटना.

चाकण प्रतिनिधी दि. १८ –

खेड तालुक्यातील आंबोली जवळच्या कोहिंडे खुर्द येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या पायल शिवाजी पारधी (वय १५, रा.कोये, ता.खेड ,जि.पुणे ) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि.१६) रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे तालुक्यासह आश्रम शाळा परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पायल शिवाजी पारधी (वय १५) ही विद्यार्थिनी कोहिंडे खुर्द (ता.खेड) येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच १५ जून २०२६ रोजी ती येथील वसतिगृहात दाखल झाली होती. मात्र शाळेच्या दुसऱ्या दिवशी तिने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पायलने वस्तीगृहातील खोलीच्या छताला असलेल्या हुकाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर शाळा प्रशासन व इतर विद्यार्थिनींमध्ये एकच गोंधळ उडाला. तिला तातडीने खाली उतरविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर जवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

विद्यार्थिनीने हे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक, शैक्षणिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला का? याचा तपास पोलीस करत आहेत.

बातमी व जाहिरातसाठी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments