Homeशैक्षणिक#शाळा : नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

#शाळा : नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

चाकण प्रतिनिधी दि.१८–

नवमहाराष्ट्र विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी तालुका खेड येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

शासनाच्या आदेशानुसार शाळेचा पहिला दिवस हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. नवीन विध्यार्थ्यांना गुलाब पुष्प, वही पेन व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक अविनाश कड व अमोल भाटी यांच्याकडून मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शाळेविषयी माहिती, शिस्त याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराबरोबर गोड पदार्थ खाण्यासाठी दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल बिरदवडे, माजी विद्यार्थी तेजस वाडेकर, पालक, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments