HomeराजकीयElection : ग्रामपंचायत निवडणूकांचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर.

Election : ग्रामपंचायत निवडणूकांचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर.

१५ एप्रिल २०२६ रोजीची विधानसभेची मतदार यादी वापरात. Election

Election

चाकण दि.२३ –

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबवावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. Election

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २४ जुलैपर्यंत प्रभाग तथा वॉर्डनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. २४ ते २९ जुलै दरम्यान प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. तर ४ ऑगस्टला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १५ जुलै २०२६ आदेशान्वये दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. Election

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments