Homeक्राईमMahalungemidcpolice : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश

Mahalungemidcpolice : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश

१२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त.

चाकण प्रतिनिधी दि.२६ –

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना तब्बल चार महिन्यांपासून गुंगारा देणारी घरफोड्या करणारी आंतरराज्यीय टोळीला अखेर गजाआड केले. Mahalungemidcpolice

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चाकण एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या कविता मदन कड या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी यात्रेनिमित्त आपल्या मूळ गावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. सुमारे १२ लाख ६० हजार रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. Mahalungemidcpolice

अटक केलेल्या आरोपींची नावे 

याप्रकरणी पोलिसांनी बिहार राज्यातील निक्कुकुमार देवकी सिंग (वय २२), रंजनकुमार देवकी सिंग (वय २०), राजकुमार ऊर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९) आणि डिंपल पटेल विनोद सिंग (वय २६) यांना अटक केली. Mahalungemidcpolice

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पराकाष्ठा.

गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संतोष काळे आणि शुभम खंडागळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे सोने घेऊन मुख्य आरोपी निक्कुकुमार देवकी सिंग हा बिहारला पळून गेल्याची माहिती मिळाली. मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी बिहार आणि कर्नाटकमध्ये सतत ठिकाणे बदलत होता. मुख्य आरोपीला त्याचा भाऊ रंजनकुमार सिंग याने सहकार्य केले होते.

पोलिसांनी तब्बल चार महिन्यांहून अधिक काळ तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे या टोळीचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर रंजनकुमार सिंग याला मुंबई येथून, तर मुख्य आरोपी निक्कुकुमार सिंग याला बंगळुरू येथून अटक करण्यात यश आले. अटकेनंतर चौकशीत आरोपींनी चोरीचे दागिने बिहारमधील सीतामढी येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिस पथकाने बिहारमध्ये जाऊन कारवाई करत १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

पोलिसांची दमदार कामगिरी.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने केली.

Chakantimes
बातमी व ज
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments