मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांवर सडकून टीका. ADITYATHAKARE

चाकण प्रतिनिधी दि.१५ – चाकण एमआयडीसीतील समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी वाहनांचा ताफा किंवा लवाजमा न घेऊन येता सामान्य नागरिकांसारखी पाहणी करावी. अशी आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. ADITYATHAKARE
स्वातंत्र्यदिनी शनिवारी (दि.१५) आमदार आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसीचा पाहणी दौरा केला. यावेळी एमआयडीसीतील वाहतूककोंडी होणाऱ्या महत्त्वाच्या चौकांची पाहणी केली. खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच कंपनी कामगारांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. २० कंपनी उद्योजकांनी आवाज उठविला म्हणून राज्य सरकारला दखल घ्यावी लागली. ADITYATHAKARE

पायाभूत सुविधा पुरविण्यास सरकार कमी.
रस्ते, वीज, पाणी, कचरा, प्रदूषण आणि सांडपाणी व्यवस्थापन यासारख्या पायाभूत सुविधा कंपनी उद्योजक व कामगारांना पुरविण्यास राज्य सरकार कमी पडत आहे. त्यामुळे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. ADITYATHAKARE
प्रशासन विभागांमध्ये समन्वयाचा अभाव.
पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, एनएचएआय आणि एमआयडीसी या महत्वाच्या प्रशासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रस्ते, वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन या सुविधा पुरविण्यास अकार्यक्षम ठरत आहे. पीएमआरडीए कडून कामाच्या फाईल्स पुढे सरकत नाही. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी असला पाहिजे. जेणेकरून प्रशस्त रस्ते तरी तयार करून मिळतील. ADITYATHAKARE
स्वर्गीय अजित पवारांच्या आठवणींना उजाळा.
आमदार रोहित पवारांनंतर आदित्य ठाकरे कडून स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आली. दादांची कामाची कार्यपद्धत ही अगदी वेगळी होती. काम शेवटापर्यंत नेण्यापर्यंत त्यांचे लक्ष असायचे. ADITYATHAKARE
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती.
या दौऱ्यादरम्यान आमदार बाबाजी काळे, जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषदेतील गटनेते विजय शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्या विनया मुंगसे, तनुजा घनवट, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, शिवाजी वरपे, सुरेश भोर, अमोल पवार, सुधीर मुंगसे, पंचायत समिती सदस्या रुपाली कांबळे, दिलीप डुबे, अर्जुन गोगावले, सुभाष मांडेकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा.













