Punenashikrailway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्गच कायम ठेवण्याबाबत विधानभवनात आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक.

शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार.

Punenashikrailway

चाकण प्रतिनिधी दि. १ –

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गच ठेवण्याच्या संदर्भात आमदारांची महत्त्व पूर्ण बैठक ही विधानभवन, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत पुणे-चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक हाच मूळ रेल्वेमार्ग कायम ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. Punenashikrailway

या बैठकीस आमदार दिलीपराव वळसे पाटील (व्हिडीओ कॉलद्वारे), आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, आमदार अक्षय कर्डिले उपस्थित होते. Punenashikrailway

उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि भविष्यातील प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने मूळ मार्गात कोणताही बदल करू नये, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. चाकण औद्योगिक परिसरासह राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा परिसरातील लाखो नागरिकांच्या वाहतूक सुविधा, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

– आमदार बाबाजी काळे.

बैठकीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाशी संबंधित विविध तांत्रिक बाबींचे सादरीकरण केले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकी वेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रकल्पाच्या मार्गाबाबत अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली. Punenashikrailway

Punenashikrailway

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत संबंधित आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहे. Punenashikrailway

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

 

 

Leave a Comment