Homeक्राईम#Accident : अपघातानंतर जखमीला दवाखान्यात नेण्याऐवजी सोडले मरणाच्या दारात..

#Accident : अपघातानंतर जखमीला दवाखान्यात नेण्याऐवजी सोडले मरणाच्या दारात..

उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपीला ४८ तासात केले अटक.

चाकण प्रतिनिधी दि.९ –

चाकण-तळेगाव मार्गावरील खालूंब्रे हद्दीत चारचाकी वाहनाच्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. वाहनचालकाने उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा बनाव करून जखमी व्यक्तीला शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून पसार झाला. वेळीच उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अवघ्या ४८ तासांत अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव मार्गावरील खालुंब्रे (ता.खेड) येथील एचपी पेट्रोल पंपासमोर मयत मनोज कुमार रामजी विश्वकर्मा (वय ३५) हे रस्ता ओलांडत असताना भरधाव चारचाकी महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच-१२ झेडई-०७७९) वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनचालक आरोपी मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याने मनोजला स्वतःच्या वाहनात बसवून दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने घटनास्थळावरून घेऊन गेला. पण तदनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने  शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यालगत मनोजला सोडून दिले. आणि तेथून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मनोजला वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. अखेर आरोपीला ४८ तासांमध्ये अटक केली. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments