Homeक्राईमक्राईम : खालुंब्रे येथे व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

क्राईम : खालुंब्रे येथे व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

दोघा जणांना अटक.

चाकण दि. १० : जमिनीच्या वादातून व्यवसायिकाच्या अंगावर भरधाव कार घालून जीवे मारण्याची घटना खालूंब्रे (ता.खेड) येथे घडली. मंगळवारी (दि.६) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिर्यादी किरण बबन शिंदे (वय.३८,रा.खालुंब्रे) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडू बापू पवार, पोपट बापू पवार (दोघे रा.खालुंब्रे, ता.खेड जि. पुणे) आणि एका अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी किरण शिंदे हे आपल्या घराकडे जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी शिंदे येण्याची वाट पाहिली. शिंदे घराजवळ पोहोचताच आरोपींनी भरधाव वेगाने मारुती स्विफ्ट कार त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत शिंदे यांनी बाजूला उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्यामध्ये कार थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे. जमिनीच्या वादातून थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा फिर्यादीने आरोप केला आहे.

उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments