चाकण दि.९ – नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी (ता.खेड) यांचा इयत्ता दहावी परीक्षा मार्च २०२६ चा एकूण निकाल हा ९६.८७ टक्के लागला.
गुणवंत विद्यार्थी यादी
पहिला क्रमांक हा प्रियदर्शनी शहाजी इंगळे (९७.२०%),
दुसरा क्रमांक हा भावेश लक्ष्मीकांत विसपुते (९५.२०%),
तिसरा क्रमांक हा विक्रांत भानुदास भगत (९२.४०%),
चौथा क्रमांक हा समिक्षा कैलास काळबांडे (९२.२०%)
पाचवा क्रमांक हा वेदिका प्रविण आलट (९०.८०%)
असे गुण मिळवले आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण २५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद व कर्मचारी यांसकडून अभिनंदन करण्यात आले.