सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान. Bhamchandra

चाकण प्रतिनिधी दि.९ –
श्री भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे स्वर्गीय आण्णासाहेब बुटेपाटील यांच्या जयंती निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खराबवाडी (ता.खेड) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाची काव्या किरण किर्ते हिने प्रथम क्रमांक पटकविला. काव्याला बक्षीस म्हणून रु. ५ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. Bhamchandra
विद्यार्थ्यांचा सहभाग.
वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लहान गटातून ३९ विद्यार्थी आणि मोठा गटातून २९ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होते. Bhamchandra
प्रभावी परीक्षक.
वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून हनुमंत कुबडे, दिलीप कसबे, सुरेश सुरनाळे, अभिजित बेंडाले, नारायण करपे, चैत्राली रोकडे यांनी कामकाज पाहिले. Bhamchandra
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष अजित बूटेपाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, उपाध्यक्ष विनोद पाचपुते, सचिव विलास काळे, शिक्षण समिती अध्यक्ष निशांत करंडे, संचालक सूनिलराव घनवट, अजित पाचपुते, प्रकाश लिंभोरे, किरण पाचपुते हजर होते. सूत्रसंचालन चंद्रकांत बुटे व प्रस्तावना प्राचार्य संजय बोरकर यांनी केले. मार्गदर्शन सल्लागार बाळासाहेब लिंभोरे आणि आभार रमेश बोऱ्हाडे यांनी मानले. Bhamchandra
हे ही वाचा.
*Road-Related Issues || कागदावर ‘ग्रामीण मार्ग २०५’ चा शिक्का, पण रस्त्याचं नशीब कधी बदलणार?












