Homeशैक्षणिक#school : वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप.

#school : वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप.

चाकण प्रतिनिधी दि १७ –

युवासेनेचे तालुका समन्वयक चंद्रकांत सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप विद्यालय, शिवे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी तर्फे वाडा येथे सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. ह्या वर्षी सुद्धा कार्यक्रम हा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, पंचायत समिती मा सदस्य रोहिदास गडदे, मुख्याध्यापक शंकर साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष विनायकराव शिवेकर, सचिव नंदकुमार शिवेकर, मा सरपंच शांताराम शिवेकर, मा सरपंच सुनील बारवेकर, मा सरपंच शांताराम गडदे, संचालक दादाभाऊ शिवेकर, चेअरमन रामदास शिवेकर, उद्योजक प्रसाद रायकर, विजु कोळेकर, अमोल तुळवे, अध्यक्ष नामदेवराव गडदे, मा सदस्य आत्माराम सातपुते, पोलीस भारतदादा सातपुते तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

संचालक अनुरागशेठ जैद यांनी चंद्रकांत सातपुते यांच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्राप्त केलेल्या यशाची आणि सामाजिक कार्याची प्रशंसा केली.

सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून दरवर्षी करत असलेल्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक साळुंखे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक संजय शिवेकर यांनी तर विनायकराव शिवेकर यांनी आभार मानले.

बातमी व जाहिरातसाठी संपर्क 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments