Homeक्राईमक्राईम : घरफोडी करणाऱ्या महिलेस २४ तासात अटक.

क्राईम : घरफोडी करणाऱ्या महिलेस २४ तासात अटक.

१० तोळे सोने जप्त, दक्षिण महाळुंगे पोलिसांची दमदार कामगिरी.

 

चाकण दि.२६ – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या २४ तासांत पकडले. पोलिसांनी उत्कृष्ट केलेल्या कामगिरीबाबत कौतुक केले जात आहे. या कारवाईत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ एप्रिल रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीचा आधार घेत घटनेचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

एका महिलेचा संशयित सहभाग आढळून आला. तपासाची सूत्रे फिरवत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सारिका संतोष भुजबळ (वय ३८, रा. पवार चाळ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) ह्या महिला आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असता धक्कादायक बाब अशी समोर आली की, आरोपी ही फिर्यादीची ओळखीची होती. बनावट चावीचा वापर करून सोन्याचे दागिने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्याकडून चोरी केलेले सर्व १० तोळे सोन्याचे दागिने (एकूण किंमत १३ लाख ८७ हजार रुपये) जप्त केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक भारत करे, महिला पोलीस अश्विनी महाडिक, वैष्णवी बालपांडे, अंमलदार युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, चेतन सावंत, राजेंद्र गिरी ,महेश गायकवाड, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड, राजकुमार हणमंते आदी होते. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार किशोर सांगळे हे करीत आहेत.

 

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments