Homeलोकल न्यूजNHAI : चाकण-शिक्रापूर रस्ता दुरुस्तीसाठी सभापती विद्या मोहिते आक्रमक

NHAI : चाकण-शिक्रापूर रस्ता दुरुस्तीसाठी सभापती विद्या मोहिते आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना नाहक त्रास

चाकण दि.२४ : तळेगाव-चाकण- शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग ५४३-डी वरील चाकण-शिक्रापूर मार्गादरम्यान साबळेवाडी (ता.खेड) येथे असणारा मोठा खड्डा बुजवला नाही, तर याविरोधात आक्रमक भूमिका घेऊ असे. खेड पंचायत समिती सभापती विद्या मोहिते यांनी सांगितले.

चाकण-शिक्रापूर या महामार्गावर साबळेवाडी येथे घाट रस्ता चढणीला भला मोठा खड्डा मागील कित्येक दिवसापासून पडला आहे. वाहनचालकांसाठी तो खड्डा मोठी डोकेदुखी ठरत आहेत. बऱ्याच वेळा या ठिकाणी गाड्या बंद पडून वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांकडून हा खड्डा चुकवायच्या नादात छोटे-मोठे अपघातही वारंवार या ठिकाणी होत आहेत. रोजच्या त्रासाला प्रवाशी व गाडीचालक तर वैतागले आहेतच. परंतु साबळेवाडी ग्रामस्थ ही यामुळे त्रस्त झाले आहेत. मार्गाच्या बाजूलाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यावर जीवावर बेतून शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडवा लागतो.

ग्रामस्थांकडून या रस्त्यावरील खड्ड्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर सभापती विद्या मोहिते यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याची पाहणी केली. तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल कदम यांना माहिती दिली असता त्यांच्याकडून पुढील दोन दिवसांत खड्डा बुजवला जाईल. असे सभापती मोहिते यांना सांगण्यात आले आहे.

यावेळी बाजार समिती संचालक सयाजीराजे मोहिते, सरपंच गणेश काटकर, रायबा साबळे, आश्विनी काटकर, अदिक साबळे, दिलीप साबळे, विजय साबळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments