Homeक्राईमMIDC POLICE : दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून २३ गुन्हे उघडकीस.

MIDC POLICE : दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून २३ गुन्हे उघडकीस.

पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते मुद्देमाल नागरिकांना परत.

चाकण दि.१६ – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण २३ गुन्हे उघडकीस आणले. आणि एकूण ५२ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालकांना परत करण्यात आला. सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी व इतर मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहवयास मिळाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी घडलेल्या मोटरसायकल चोरी, घरफोड्या व इतर चोरीच्या घटनांमध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी चोरी व इतर गुन्ह्यांचा छडा लावून एकूण २३ गुन्हे उघडकीस आणले होते. उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये चोरीच्या मोटारसायकली, सोन्याचे दागिने, मोबाईल, टेम्पो व रोख रक्कम असे एकूण ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकास देण्यात आला. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पिंपरी चिंचवड मंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम पार पडला.

 

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त परिमंडळ चार श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त महाळुंगे एमआयडीसी विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा अनिल देवडे, हवालदार अर्चना काळे, दत्तात्रय कुंभार व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments