Homeराजकारण#PoliticalWar : आमदार बाबाजी काळेच्या आरोपांच्या प्रत्युत्तरात माजी आमदार मोहितेनी डागले टिकास्त्र.

#PoliticalWar : आमदार बाबाजी काळेच्या आरोपांच्या प्रत्युत्तरात माजी आमदार मोहितेनी डागले टिकास्त्र.

माजी आमदार दिलीप मोहिते व जिल्हा परिषद गणेश बोत्रे यांच्याकडून ही आरोपांच्या फैरी.

चाकण दि. ७ जून –

“आमदार काळे यांनी आम्हाला सिंडिकेट म्हणत बालिशपणा केला असून, आमच्यावर होत असलेले आरोप निराधार आहेत. उलट आमदार काळेचेच लोक एमआयडीसीत दादागिरी करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार मोहिते आणि झेपी सदस्य बोत्रे यांनी केला.”

चाकण एमआयडीसी परिसरातील टॉपबँड इंडिया व इतर कंपन्यांच्या नोंदणी व अनधिकृत बांधकामावरून वाद सुरू झाला होता. तेव्हा या विषयावरून आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते आणि झेपी सदस्य गणेश बोत्रे यांच्यावर आरोप केले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल चाकण (ता.खेड) येथे मोहिते यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

माजी आमदार मोहिते यांचे आरोपांवर प्रत्युत्तर.

आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विनाकारण माझे नाव गोवले गेले आहे. आमच्यावर चुकीचे आरोप सुरू असून उलट त्यांचेच लोक कंपन्यांमध्ये जाऊन दादागिरी करतात. अनेक कंपन्यांनी पूर्णत्वाच्या दाखल्यापेक्षा अधिकचे अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच अनेक कंपन्यांची नोंद नसल्याने स्थानिक ग्रामपंचायत आणि राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. जर असे प्रकार थांबले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.

मोहिते पाटील पुढे म्हणाले की, मी आणि गणेश बोत्रे यांनी कुठे दहशत केली, हे त्यांनी दाखवावे. उलट एमआयडीसीच्या चुकीच्या कामांवर त्यांनी बोलावे. येथील वातावरण उद्योगांना पूरक असून, परराज्यातील उद्योग येथे येत आहेत. जर आम्ही दादागिरी करतो. असे काळे यांना वाटत असेल. तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यावी, असे आव्हानही मोहिते यांनी दिले. उलट स्वतःच्या भाच्याला आणि मुलाला कामे मिळवून देण्यासाठी ते कंपन्यांमध्ये जातात, असा गंभीर आरोपही करण्यात आला.

जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांचे प्रत्युत्तर.

आम्ही रीतसर पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्या झेपी गटाचा प्रश्न म्हणून मी कंपनी नोंदीचा विषयाला हात घातला. माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, मी दादागिरी केली असे आढळल्यास राजीनामा देईल. आमच्या या भूमिकेनंतर जवळपास १९८ कंपन्यांनी नोंदी केल्या असून, २०० कंपन्या बाकी आहेत. नोंदणी झाल्यानंतर हा टॅक्स आमच्या घरी येत नाही, तर तो आमच्या गावासह अन्य ११ गावांच्या विकासासाठी वापरला जातो. माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही चुकीचे आरोप केले जात आहेत.

या पत्रकार परिषदेनंतर एमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या नोंदणीचा विषय अधिक चर्चेत आला आहे. बोत्रे यांनी केलेल्या मोहिमेमुळे अनेक कंपन्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यामुळे शासनाचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे परिसरातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पत्रकार परिषदेदरम्यान माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, बाजार समिती संचालक पप्पू टोपे, जयसिंग दरेकर, राम गोरे, अमोल पानमंद, सुयोग शेवकरी, मोबिन काझी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments