Homeलोकल न्यूजवडगाव घेनंद येथे एकल महिलांचा सन्मान.

वडगाव घेनंद येथे एकल महिलांचा सन्मान.

चाकण प्रतिनिधी दिनांक २४ –

ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांच्याकडून गावांमधील एकल महिलांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच ग्रामपंचायत व एफआयसीसीआय तसेच Wockhardt फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर राबविण्यात आले. तसेच एकल महिलांना रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्याची शाश्वती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन हे खेड पंचायत समितीचे सभापती विद्या मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मोफत नेत्र तपासणीची फीत ही पंचायत समिती सदस्य प्रसाद घेणंद यांच्या हस्ते कापण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, उपासभापती मंगेश सावंत, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्ताराधिकारी तुषार साळुंखे व प्रशासक सोनाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पूनम मॅडम यांच्याकडून देण्यात आले. त्याचबरोबर सीएसआर मधून शाळेला कॉम्पुटर व प्रिंटर देण्याची शाश्वती दिली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments