Homeलोकल न्यूजMIDC POLICE : पोलीस महासंचालक पदकाने राजेंद्र कोणकेरी सन्मानित.

MIDC POLICE : पोलीस महासंचालक पदकाने राजेंद्र कोणकेरी सन्मानित.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते सन्मान.

चाकण दि.३ – उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोणकरी यांना “पोलीस महासंचालक पदक” देऊन गौरव करण्यात आला आहे.  

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोणकेरी यांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

उल्लेखनीय कामगिरीचा आढावा

१) ६९ आरोपींवर मोक्का,

२) २७ आरोपींना तडीपार,

३) ५ आरोपींना एमपीडीए,

४) खुनाचे १२ आरोपींना जन्मठेप शिक्षा,

५) बलात्काराचे २ आरोपींना दहा वर्ष शिक्षा,

६) विनयभंगाचे १ आरोपींस सहा महिने शिक्षा,

७) २ खून व ५ घरफोडी उघड करून आरोपींस जेरबंद.

अशा केलेल्या विविध कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला.

 

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ तसेच उत्तर व दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments