Homeलोकल न्यूजChakanmidc : चाकण एमआयडीसीतील रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा. - जिल्हाधिकारी जितेंद्र...

Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा. – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Chakanmidc
वाढत्या अपघात मालिकांमुळे आदेश. Chakanmidc

चाकण प्रतिनिधी दि.६ – :

चाकणसह एमआयडीसी परिसरातील वाढत्या अपघात मालिका, रस्त्यांची दयनीय दुरावस्था आणि जटील बनलेली वाहतूककोंडी याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी या विभागाच्या अधिकाऱ्यांना २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. Chakanmidc

या बैठकीस एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता निलेश मोडवे, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पीएमआरडीएचे शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुलाब इनामदार, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. Chakanmidc

प्रमुख रस्त्यांवर भीषण वाहतूककोंडी.

चाकणमधील पुणे नाशिक महामार्ग, चाकण-आंबेठाण-वासुली, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर तसेच एमआयडीसीमधील फॉक्सवॅगन मार्ग, महाळुंगे-तळवडे मार्ग या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे अपघातांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अपुरे पोलिस संख्याबळ असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. Chakanmidc

जिल्हाधिकारी डुडी यांचे स्पष्ट आदेश.

* युद्धपातळीवर खड्डे दुरुस्तीचे आदेश

* खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे.

* रस्त्यांच्या साईड पट्ट्याची सुधारणा करणे.

* आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स लावणे.

* सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने निश्चित मुदतीत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी केले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे महत्वाचे आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करावीत, असे आदेश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केले. Chakanmidc

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

 

हे ही वाचा.

https://rbpnews.com/news/shive_vakii_gramsthamchii_pimprii_chimchvd_mhapalikevr_dhdk_rsta_durustiivruun_smhomesh_rsta_durustii_kra_anytha_kam_bmd_paduu_2

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments