Monday, September 28, 2026
spot_img
Home सामाजिक KHED : खेडच्या पश्चिम भागातील खराब रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार : आमदार...

KHED : खेडच्या पश्चिम भागातील खराब रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार : आमदार बाबाजी काळे

0
12
KHED
मूलभूत समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमदारांची ग्रामस्थांना ग्वाही. KHED
KHED
संग्रहित छायाचित्र

 

चाकण प्रतिनिधी ता.१० – 

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करणार आहे. बैठकीत ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांच्या समस्या मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू. अशी ग्वाही खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली. KHED

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांच्या निषेधार्थ खेड तालुका पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या तरुणांच्या पुढाकाराने सुपे-सातकरवाडी (ता. खेड) येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. KHED

यावेळी आमदार काळे म्हणाले, “प्रजिमा १६ व १७ तसेच वाशेरे-वाजवणे या तिन्ही रस्त्यांसाठी नाशिक कुंभमेळा विकासाअंतर्गत सुमारे १४२ कोटी निधीची तरतूद पुरवणी बजेटच्या (१ जुलैच्या) प्रोसिडिंगमध्ये करण्यात आली आहे. तसेच पश्चिम भागातील रस्ते दुरुस्तीसाठी यापूर्वीच संबंधित विभागाला आदेश दिले होते. मात्र, जोरदार पावसामुळे रस्ता दुरुस्तीची कामे ठप्प झाली आहेत. येत्या काही दिवसात साइडपट्टी दुरुस्तीसह मुरूम व खडी टाकून खड्डे बुजवण्यात येतील.” KHED

आजच्या बैठकीत पश्चिम भागातील अनेक गावच्या सर्वपक्षीय तरुणांनी ठिकठिकाणच्या रस्ते, वीज, पाणी, मोबाइल टॉवर, दळणवळण सुविधा याबाबत तक्रारींचा पाढा आमदार यांच्यापुढे वाचत ठोस निर्णयाची मागणी केली. तरुणांचा जोश व निर्धार पाहून येत्या आठ दिवसात सर्व तक्रारींचे निरसन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. KHED

बैठकीस पुढाऱ्यांची उपस्थिती.

या बैठकीस माजी सभापती सुरेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, विठ्ठल वनघरे, खासदार कोल्हे यांचे स्वीय सहायक तेजस झोडगे, मुंबई डब्बेवाला संघटनेच्या प्रवक्त्यांसह अनेक सदस्य, पश्चिम भागातील भोरगिरीपासून करंजविहिरे, हेद्रूजपासून गडद, वांद्रा, कुडा, घोटवडी, परसुल, खरपुडपर्यंतच्या सुमारे ६४ गावचे सरपंच, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. KHED

पश्चिम विभाग संघर्ष समितीची स्थापना.

‘एकच ध्यास पश्चिम भागाचा विकास’ हे ध्येय मनाशी बाळगून खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील तरुणांनी ‘खेड तालुका पश्चिम विभाग संघर्ष समितीची स्थापना केली. त्या समिती अंतर्गत अत्यंत दुरवस्था झालेले रस्ते, विस्कळीत वीजपुरवठा, पाणी योजना आणि दळणवळण सुविधा याबाबत उद्धीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आजच्या पहिल्या बैठकीत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील खराब रस्त्यांचा विषय प्राधान्याने घेण्यात आला. खराब रस्त्याच्याबाबत गेली काही वर्षांपासून ठोस उपाययोजना होत नसल्याने आणि सर्वच राजकीय पुढारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने तरुणांनी एकजूट करत सर्वपक्षीय मार्ग निवडला याचे सर्वत्र कौतुक होत आहे. KHED

हे ही वाचा. https://lokknyaaymarathi.com/political-activity-babasaheb-pawar-the-model-sarpanch-of-birdavadi-has-been-appointed-as-an-expert-director-of-the-chakan-vividh-karyakari-society

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here