HomeसामाजिकAjitdadaPawar : ग्रामपंचायत वडगाव घेणंद येथे अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात...

AjitdadaPawar : ग्रामपंचायत वडगाव घेणंद येथे अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी.

ग्रामपंचायतीची अभिनव उपक्रमाची घोषणा. AjitdadaPawar

Ajitdadapawar

चाकण दि.२२ –

ग्रामपंचायत वडगाव घेणंद (ता.खेड) येथे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. AjitdadaPawar

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,  गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्ताराधिकारी तुषार साळुंखे, प्रशासक तथा तालुका कृषी अधिकारी सोनाली पवार, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, उपसभापती मंगेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेनंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाडेकर/साबळे, ग्रामस्थ हंबीर बवले, सुदाम बवले, देवानंद बवले, शरदचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप करंडे, प्राध्यापक चिंतामण शिवेकर, शिक्षकवृंद, आरोग्य सेवक हरित जाधव व  ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते. AjitdadaPawar

Ajitdadapawar

अभिनव उपक्रमाची सुरवात.

माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रामपंचायतीकडून अभिनव उपक्रमाची नागरिकांसाठी घोषणा करण्यात आली आहे.

१. ज्याच्या घराचा परिसर स्वच्छ असेल.

२. ओला व सुका कचरा वर्गीकरण जो कुटुंब करेल.

३. सेंद्रिय शेती जे कुटुंब करेल.

अशा कुटुंबांचा ग्रामपंचायतीतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाडेकर यांनी दिली. AjitdadaPawar

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments