अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत.

चाकण प्रतिनिधी दि. २९ –
खेड तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना (डी एन ई १३६) यांची निवडणूक प्रक्रिया रविवारी (दि.२८) पंचायत समिती कार्यालय (ता.खेड) येथे पार पडली. संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर काळुराम ढोरे, उपाध्यक्षपदी रविंद्र रामचंद्र उगले आणि सचिवपदी बाबाजी भालचंद्र चव्हाण यांची निवड झाली. Election

संघटनेच्या फक्त अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष पदासाठी शंकर ढोरे व नितीन नाईकडे यांनी अर्ज भरले होते. Election

या अगोदर सचिव, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष, कोशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख आणि संचालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. सर्व विजयी नवनिर्वाचित उमेदवारांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खेड तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. Election

नवनिर्वाचित कार्यकारी संचालक मंडळ.
★ अध्यक्ष : शंकर काळुराम ढोरे
★ उपाध्यक्ष : रविंद्र रामचंद्र उगले
★ सचिव : बाबाजी भालचंद्र चव्हाण
★ महिला उपाध्यक्ष : प्रमिला हरिभाऊ डोंगरे
★ कोशाध्यक्ष : काकासाहेब जनार्धन मिंड
★ कार्याध्यक्ष : सुदाम भिवाजी कड
★ प्रसिद्धी प्रमुख : शरद सुभाष शिरसाठ
★ संचालक : अमोल दत्तात्रय भालेराव
★ संचालक : प्रमिला मारुती सुळके
★ संचालक : प्रमोद रामचंद्र बनसोडे
★ संचालक : भागू भिवा आढारी
★ संचालक : मधुकर पांडुरंग डवणे
