पूर्णाकृती पुतळे उभारणारी पहिलीच ग्रामपंचायत.

चाकण प्रतिनिधी, दिनांक १७ –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे (ता.खेड) येथे या बुधवार दि.१७ जून रोजी पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
महाळुंगे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हे खेड आळंदी विधानसभा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या अनावरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, विजयसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, सदस्य रूपाली कांबळे, खासदार अमोल कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक तेजस झोडगे ह्या विशेष मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम व राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा गुणगौरव केला. युवकांनी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच किशोर भालेराव, नितीन फलके, शेखर तुपे, ऋषिकेश मिंडे, विश्वनाथ महाळुंगकर, मनोज इंगवले, लक्ष्मण महाळुंगकर, पांडुरंग काळे, मयुरी महाळुंगकर, वैशाली महाळुंगकर, दिपाली भोसले, जयश्री वाळके, वैशाली जावळे, ग्रामविकास अधिकारी बी.बी. गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, उद्योजक रोहिदास तुपे, मुकुंद महाळुंगकर, रामराव मिंडे, शामराव पवार, विलास शिवळे पाटील, गणपत भोसले, शंकर महाराज महाळुंगकर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश जाधव तर आभार उपसरपंच किशोर भालेराव यांनी केले.

स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या त्यागातून या भागात उद्योगधंदे उभे राहिले आहेत. सर्व शासकीय निधींचा योग्य वापर आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे ही ग्रामपंचायत यशस्वीपणे काम करीत आहेत. गावाने आपला सांस्कृतिक वारसा जपला आहे. या पुतळ्यांच्या माध्यमातून महाराजांचे विचार जोपासले जातील.
— आमदार बाबाजी काळे.
सर्व शासकीय बाबींची पूर्तता करून दोन्ही छत्रपतींचे पूर्णाकृती पुतळे उभारले आहेत. रीतसर परवानगी घेऊन पुतळा उभारणारी आमची पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे.
– सरपंच अर्चना महाळुंगकर.
