Homeराजकारण#Grampanchayatelection : खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतीची तारीख जाहीर.

#Grampanchayatelection : खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतीची तारीख जाहीर.

दि.११ व १२ जुनला सदस्य आरक्षण सोडत.

चाकण दि.६ – स्थानिक स्वराज्य संस्थामधील गाव पातळीवरील महत्वाचा घटक असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे लवकरच बिगुल वाजणार. या आशेने इच्छुक उमेदवारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

खेड तालुक्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ असणाऱ्या आणि सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागनिहाय सदस्यांची नव्याने निश्चिती करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये तालुक्यातील एकूण ११० ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर झाल्या असून दि.११ व १२ जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे.

दि.११ जून (गुरुवार) रोजी —

मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे, बिरदवडी, कुरुळी, वराळे, सावरदरी, रानमळा, वासुली, शिंदे, कान्हेवाडी तर्फे चाकण, सांगूर्डी, शेलू, मोई, केळगाव, चिंबळी, धानोरे, चऱ्होली खुर्द, मरकळ, कोयाळी तर्फे चाकण, वाकी खुर्द, चांडोली, रासे, भोसे, राक्षेवाडी, खरपूडी बुद्रुक, खरपूडी खुर्द, आखरवाडी, जरेवाडी, जैदवाडी, खालची भांबूरवाडी, वरची भांबूरवाडी, टाकळरवाडी, दावडी, काळुस, तुकाईवाडी, पाडळी, पांगरी, वेताळे, साबुर्डी, कमान, कान्हेवाडी बुद्रुक, कडधे, मोहकल, कुरकुंडी, खरोशी, नायफड, गोणवडी, निमगाव, कन्हेरसर, जवळके बुद्रुक, बीबी, वाकळवाडी, गोसासी, चिंचबाईवाडी व वाफगाव यांची होणार आहे.

 दि.१२ जून (शुक्रवार) रोजी —

रेटवडी, पूर, गोलेगाव, पाळू, दोंदे, चांदूस, शिवे, कडूस, करंजविहिरे, आसखेड खुर्द, किवळे, कोरेगाव बुद्रुक, वडगाव न खेड, पिंपरी बुद्रुक, गडद, तळवडे, चिंचोशी, अहिरे, तोरणे बुद्रुक, हेद्रुज, कुडे खुर्द, कुडे बुद्रुक, वाजवणे, येणिये बुद्रुक, औदर, घोटवडी, आंबोली, विऱ्हाम, कळमोडी, औंढे, वांद्रा, शिरगाव, टोकावडे, धामणगाव खुर्द, शेंदुर्ली, भोरगिरी, कडाचीवाडी, खराबवाडी, कोये, पाईट, कोहिंडे बुद्रुक, खालुंब्रे, वडगाव घेनंद, सोळू, जऊळके खुर्द, गुळाणी, सायगाव, वाशेरे, आंबेठाण, बोरदरा, रौंदळवाडी, टेकवडी, धामणे व आसखेड बुद्रुक यांची आरक्षण सोडत होणार आहे. 

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments