HomeBlogपंढरपूर आषाढी वारी : हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याच्या अध्यक्ष पदी नागेश शेलार.

पंढरपूर आषाढी वारी : हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याच्या अध्यक्ष पदी नागेश शेलार.

उपाध्यक्षपदी विठ्ठल बिरदवडे यांची निवड.

 

चाकण दि.१७ – हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा, खराबवाडी-वाघजाईनगरच्या अध्यक्षपदी नागेश अशोक शेलार यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दत्तात्रय बिरदवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पंढरपूर येथे होत असलेल्या आषाढी वारीनिम्मित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे ८ जुलै रोजी होणार आहे. हनुमान प्रासादिक दिंडी क्रमांक हा २०६ आहे. तेव्हा दरवर्षी प्रमाणे दिंडी ही माऊलींच्या पालखी सोबत पायी जात असते. या पार्श्वभूमीवर दरवर्षी नव्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. नवनिर्वाचित सदस्यांच्या निवडीवर मान्यवर, ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यंदाचा दिंडी सोहळा अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

*नागेश शेलार, अध्यक्ष, हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा.

 

सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरत धार्मिक आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

*विठ्ठल बिरदवडे, उपाध्यक्ष, हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments