BIKE THIEF : मोटार सायकल चोरणारे सराईत चोर अटकेत.

पिंपरी चिंचवड परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची माहिती.

३६ लाखाच्या २४ मोटारसायकली जप्त.

चाकण दि.७ – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक चोरीची मोटरसायकल शोधताना चोरीच्या तब्बल अजून २४ मोटार सायकली हस्तगत करून वाखन्याजोगी दमदार कामगिरी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिपकुमार किशोरी सरन निसाद यांची स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच १४ एनसी ६४६३) ही दुचाकी पानसे ऑटो प्रायव्हेट लिमिटेड महाळुंगे, ता.खेड जि.पुणे येथील पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्यात आली होती. गु.र.नं.२९८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २०२३ कलम ३०३(२), ३(५) अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस पथकाकडून तपास करत असताना महाळुंगे ते जुन्नर असा ८० कि.मी.पर्यंत सीसीटीव्ही दृश्य आणि तांत्रिक तपास केला असता आरोपी यश सुनील हांडे (वय १९ वर्ष, रा. पिंपळगाव सौदा, ता.जुन्नर जि.पुणे) आणि किरण संभाजी जाधव (वय २६ वर्ष रा. टिकेकरवाडी, ता.जुन्नर जि. पुणे) चोरीची दूचाकी यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवून कसून तपास केला असता आरोपींनी पुणे, ठाणे, नाशिक, बृहन्मुंबई, नवी मुंबई, अहिल्यानगर या शहरांमधून मोटर सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून एकूण रु.३६ लाख किमतीच्या २४ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या.

 

पिंपरी चिंचवड – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून होंडा शाईन (एमएच १४ एलडी ७५२०), हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच १४ एनसी ६४६३), दक्षिण चाकण पोलीस स्टेशन हद्दीतून हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच २६ सी एन ८७४८), चिखली पोलीस स्टेशन हद्दीतून यामाहा आर वन फाईव्ह (एमएच १४ केआर ७६७६), आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच १४ एलजी ७९५६)

पुणे ग्रामीण – जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतून होंडा एक्टिवा (एमएच १४ जीजी ९९१९),

बृहन्मुंबई शहर – मुलुंड पोलीस स्टेशन हद्दीतून यामाहा आर वन फाईव्ह (एमएच ०४ एमएस ५५१८), सायन पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ०१ ईएस ५५७५), नवघर पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ०३ ईके १११६), कांजूरमार्ग पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ०३ सीआर ६०९५),

ठाणे शहर – नवपाडा पोलीस स्टेशन हद्दीतून बजाज पल्सर २२० (एमएच ०४ के झेड ३१४०), डायघर पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ०२ जीएम ०७९१), कोनगाव पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एचआर १८ ई ९०७९), अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ०५ एजी ६६६७), कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ०५ एफएम ३३४९),

नवी मुंबई – शहर सानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतून होंडा यूनिकॉर्न (एमएच ४३ एएम ०८६२), रबाळे पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच ४३ सीडी १८०७),

नाशिक शहर – मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच १५ एचझेड ६१६१), इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच १५ एसएस ७४४४),

अहिल्यानगर ग्रामीण – संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच १७ डीई ७९७९), लोणी पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच १७ डीजी ९९२१), राहाता पोलीस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड बुलेट क्लासिक ३५० (एमएच १७ सीडब्लू ९५१४),

सुझुकी बर्गमन स्ट्रीट (एमएच ०५ ईएस ४५०८), यामाहा आर वन फाईव्ह (एमएच ०५ डीडब्लू ७३४५)

अशी एकूण २४ वाहने जप्त करण्यात आली.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त परिमंडळ चार श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त महाळुंगे एमआयडीसी विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस अंमलदार चेतन सावंत, युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, राजकुमार हनमंते, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, शिवाजी मरकड व आकाश घाडगे यांनी केली.

Leave a Comment