Homeक्राईमदक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस : मटका व जुगार अड्डे चालविणारा सराईत आरोपी...

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस : मटका व जुगार अड्डे चालविणारा सराईत आरोपी स्थानबद्ध.

एमपीडीए कायद्यांतर्गत आरोपी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे एक वर्ष स्थानबद्ध

चाकण दि.२१ – चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मटका व जुगाराचे अड्डे चालविणारा सराईत आरोपी रफिक शगीर काझी याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक शगीर काझी (वय-३९ वर्षे, रा. काझीवाडा, महात्मा फुले चौक, चाकण ता.खेड जि.पुणे) हा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण नावाचा मटका व जुगाराचे अड्डे चालवत होता. त्यावेळी आरोपीवर एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आरोपीचा स्थानबद्धते बाबतचा प्रस्ताव हा परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, महाळुंगे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पाठवला होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा १९८१ (एमपीडीए) कायद्यांतर्गत आरोपीला एक वर्ष स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. पण आरोपी हा पोलिसांना मिळून येत नव्हता. तेव्हा तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मार्फत शोध घेऊन शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी (दि.२१) मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबद्धतेसाठी रवाना करण्यात आले.

सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग अनिल देवडे, साहेब पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, चिंचकर, संतोष जगताप, नंदू तरटे व गणेश मापारी यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments