Monday, September 28, 2026
spot_img
Home औद्योगिक Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील कंपनी स्थलांतराच्या संदर्भात उद्योगमंत्र्यांनी उद्योजकांशी साधला संवाद.

Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील कंपनी स्थलांतराच्या संदर्भात उद्योगमंत्र्यांनी उद्योजकांशी साधला संवाद.

0
16
Chakanmidc
जिल्हाधिकाऱ्यांचा वाहतूककोंडीवर मास्टर प्लॅन. Chakanmidc

Chakanmidc

चाकण प्रतिनिधी दि.१७ –

चाकण एमआयडीसीतील २० कंपन्या स्थलांतरित होणार यावरून रणकंदन उठले होते. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि.१६) चाकण दौरा करून उद्योजकांशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करून त्यावर अखेर पडदा टाकला. Chakanmidc

उद्योगमंत्र्यांकडून एमआयडीसीची पाहणी.

चाकण दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्र्यांनी चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची व खड्ड्यांची ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या सदस्यांसह पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर स्थानिक नागरिक, वाहनचालक यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. Chakanmidc

उद्योजकांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.

औद्योगिक क्षेत्राच्या पाहणी दौऱ्यानंतर उद्योग मंत्र्यांनी उद्योजकांबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उद्योजकांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत खराब रस्ते, खड्डे, घनकचरा, वीज व पाणीपुरवठा यावर सविस्तर चर्चा केली. पीएमआरडी, पीडब्ल्यूडी, एमआयडीसी या विभागाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय साधून सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी दिल्या. Chakanmidc

Chakanmidc

जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लॅन.

• मुख्य महामार्गांसहित औद्योगिक क्षेत्रातील रस्ते हे पुढील पंधरा दिवसात खड्डेमुक्त करण्यात येतील.

• वाहतूककोंडी होणारे रेड झोन जे रस्ते आहेत. त्यावर काम करून ते रस्ते सुधारण्यात येतील.

• नव्याने ५०० किलोमीटरचे रस्ते बनविण्यात येणार आहेत. त्या रस्त्यांच्या बाबतीत प्लॅन पुढील दोन महिन्यात तयार करण्यात येईल. त्यानंतर पुढील दहा महिन्यात नवीन रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.

• मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे ही पुढील दहा दिवसात काढून घेण्यात येतील.

घनकचरा व वीज वितरण विभागासाठी जागेचे नियोजन.

घनकचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसी विभाग हा पीएमआरडी विभागाला जागा देऊन घनकचरा व्यवस्थापन प्लांट लवकर उभा करण्यात यावा. तसेच चाकण एमआयडीसीतील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी सब स्टेशनला जागा देण्यात येणार. अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्योगमंत्र्यांकडून देण्यात आल्या.

Chakanmidc

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद.

उद्योजकांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही व्हिडीओ कॉलद्वारे मार्गदर्शन केले. बोलताना म्हणाले की, एक खिडकी योजनेतून कंपनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात. मुख्य महामार्गावरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य देण्यात यावे. खड्डे बुजवण्याबरोबर साईडपट्ट्या भरण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. जिओ पॉलिमर, टेक्नोपॅच आणि एमसिओ विथ हार्डनर यांचा खड्डे बुजवण्यासाठी वापर करावा.

लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांची उपस्थिती.

खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, विधानपरिषद नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही बैठकीत मार्गदर्शक सूचना केल्या. महाराष्ट्र राज्य एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमआरडीआय आयुक्त अभिजीत चौधरी, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी कामात कसूर किंवा दिरंगाई केली तर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

– उदय सामंत, उद्योगमंत्री

हे ही वाचा.

उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी खड्डे भरणे म्हणजे नौटंकी: रणजित गाडे यांचा आरोप.

https://rbpnews.com/news/udyog_mmtryamchya_dau_yasathii_khdde_bhrne_mhnje_nautmkii_rnjit_gade_yamcha_aarop_2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here