माजी आमदार मोहिते यांची उद्योग मंत्र्यांवर सडकून टीका. Chakanmidc
चाकण प्रतिनिधी दि. २१ –
चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाणेकरवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी अखेर आमरण उपोषण सोडले. चाकण एमआयडीसी ला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण पुढील सात दिवसांत मार्गी लावू. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्यानंतर गणेश बोत्रे यांनी आमरण उपोषण त्यागले. Chakanmidc
गणेश बोत्रे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या.
१) चाकण एमआयडीसीतील चौकांमधील अतिक्रमणे काढून सिमेंट कॉंक्रिटीकरण करावे.
२) एमआयडीसी व पीएमआरडीएकडून करण्यात आलेल्या निविदांमध्ये रस्ता पूर्ण करण्याचा कालावधी कमी करण्यात यावा.
३) चाकण एमआयडीसीतील जड-अवजड वाहनांसाठी वाहनतळाची (ट्रक टर्मिनल) संख्या वाढवण्यात यावी.
४) मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यात यावा. त्यामुळे अपघात व ट्राफिकची समस्या कमी होईल.
५) चाकण औद्योगिक वसाहतमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी प्लांट उभारण्यात यावा.
६) चाकण एमआयडीसी ला जोडणाऱ्या रस्त्यांच्या निधिंचा लेखाजोखा पीएमआरडीकडून जाहीर करण्यात यावा.
७) एमआयडीसीतील कंपनी कामगारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
८) चाकण एमआयडीसीतील समस्या निवारण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत स्थानिक प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा. Chakanmidc

राजकीय नेत्यांसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती.
जिल्हा परिषद गणेश बोत्रे यांची यांनी आमरण उपोषण सोडवे यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, सभापती दीपाली हुलावळे, सभापती जितेंद्र बढेकर, समीर सुपे, राजाभाऊ थोरात, माजी सभापती शरद बुट्टेपाटील, अंकुश राक्षे, दत्तात्रेय भेगडे, बाजार समिती उपसभापती रंजित गाडे पाटील, पंचायत समिती सदस्य शंकर कावडे व विशाल तुळवे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी मिलिंद गवळी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. Chakanmidc
माजी आमदार मोहितेंची यांची उद्योगमंत्र्यांवर टीका.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील बोलताना म्हणाले की, उद्योगमंत्र्यांनी राज्याचे सर्वस्वी असल्यासारखे निर्णय घेऊ नयेत. पूर्वी उद्योग खाते देसाई यांच्या मुलाने आणि आता उदय सामंत यांचे भाऊ उद्योग खाते चालवत असल्याचा गंभीर आरोप केला. Chakanmidc
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आश्वासित केल्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुढील काळात प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू.
– गणेश बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य, पूणे
हे ही पहा. चाकण – तळेगाव रस्त्यावर महाळुंगे इंगळे येथे धावत्या स्विफ्टने घेतला अचानक पेट.!
https://youtube.com/shorts/ldSRFwzn3Ng?feature=share














