MH-12 1A ही नवी सिरीज. PUNE
चाकण प्रतिनिधी दि.६ –
“पुणे तेथे काय उणे” ह्या म्हणीच्या साक्षात्काराची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यास निम्मित ठरले आहे. MH12 1A ह्या नव्या वाहन क्रमांकाची मालिका. महाराष्ट्र राज्यात अशा नवीन सिरीज प्राप्त करण्याचा बहूमान पुण्याने मिळवला आहे. MH12 क्रमांकाचे वाहन बघितले की, आपसूक तोंडातून निघते पुण्याची गाडी आहे ना! पुण्याची ओळख असणाऱ्या MH12 चा रुबाब संपणार असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. पण नव्या नंबरच्या सिरीजमुळे इथून पुढे ही पुण्याचा तोच रुबाब कायम राहणार असल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. PUNE
MH 61 नंबर मालिकेचा विचार?
पुणे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या वापरली जाणारी ‘MH 12 ZZ’ या नंबरची मालिका संपत आली आहे. तेव्हा प्रादेशिक परिवहन विभागाकडे नव्या वाहनांच्या नोंदणीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर पर्याय म्हणून ‘MH 61’ मालिका सुरू करण्याचा विचार सुरु होता. मात्र ‘MH 12’ ही पुणेकरांच्या ओळखीचा तसेच जिव्हाळ्याचा भाग असल्याने नागरिकांकडून त्यास विरोध व्यक्त करण्यात आला होता. तेव्हा पुणेकरांना भीती होती की, आपली ओळख पुसली जाणार. PUNE
“MH 12 1A” नव्या सिरीजला मंजुरी.
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणेकरांची समस्या मांडली. यानंतर केंद्र सरकारने ‘MH 12 1A’ या स्वरूपातील नव्या नंबर सिरीजला मंजुरी दिली आहे. तेव्हा पुण्यात प्रथमच एक अंक आणि एक अक्षर अशा पद्धतीची वाहन नोंदणी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे नव्या वाहनांनाही ‘MH 12’ ही ओळख कायम राहणार असल्याने पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुणे शहर व परिसरात वाढत्या वाहनसंख्येचा प्रश्न सोडवण्यासाठी हा अभिनव निर्णय शहरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्याचबरोबर पुणेकरांची ओळखही अबाधित राहणार असल्याने पुणेकरांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. PUNE
