Ashadhiwari : ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांनी राबविली स्वच्छता श्रमदान मोहीम.

स्वच्छता श्रमदान मोहिमेसाठी देणगीदारांचा पुढाकार. Ashadhiwari

चाकण प्रतिनिधी दि. ६ –

पंढरपूर आषाढी वारीनिम्मित पुणे जिल्हा परिषद व खेड पंचायत समिती यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांच्याकडून ६ जुलै रोजी स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. AshadhiwariAshadhiwari

वडगाव घेनंद (ता.खेड) येथे आषाढी वारी २०२६ निमित्त गावामध्ये लोक वर्गणी काढून स्वच्छता श्रमदान मोहीम आयोजित करून स्वच्छता श्रमदान मोहीम गावामध्ये राबविण्याचे ठरवले होते. परंतु अतिवृष्टी मुळे स्वच्छता मोहीम रद्ध करण्यात आली. त्या ऐवजी ग्रामस्थांच्या सुचनेनुसार वडगाव घेनंद ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून दिंडीतील विधवा महिलांना रेनकोटचे वाटप केले. तसेच आषाढी वारीतील लोकांना नाश्त्याचे नियोजन केले. Ashadhiwari

Ashadhiwari

यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य विजयसिंह शिंदे सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेनंद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर, विस्तार अधिकारी तुषार साळुंखे, ग्रामपंचायत प्रशासक सोनाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. Ashadhiwari

याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाडेकर/साबळे,  पोलीस पाटील भानुदास नितनवरे, सोसायटी सचिव निलेश यादव, ग्रामपंचायत कर्मचारी गोरक्ष बवले, विजय बवले, आदित्य घेनंद, सी.आर.पी नूतन बवले, अंगणवाडी सेविका लता गोसावी, मदतनिस मनीषा रसाळ, काजल रसाळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. Ashadhiwari

Leave a Comment