Homeक्राईमCountryliquor : चाकण एमआयडीसीत बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक.

Countryliquor : चाकण एमआयडीसीत बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक.

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई.

चाकण प्रतिनिधी दि.५ –  

चाकण एमआयडीसीत अवैधरित्या देशी दारू व हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाई भांबोली आणि गोनवडी गावांच्या हद्दीतील नदीकाठाजवळ करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. Countryliquor 

दोन आरोपींना अटक 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस शिपाई रामहरी महादेव शिंदे आणि पोलीस कर्मचारी मंगेश देवराम कदम यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी विश्वजीत बिपीनकुमार महालिंगे (वय १९, रा. भांबोली, ता.खेड जि.पुणे) आणि जीवन मारुती राजपूत (वय ४८, रा. गोनवडी, ता. खेड, जि.पुणे) यांना अटक करण्यात आली. Countryliquor

कारवाई कुठे व किती माल हस्तगत?

भांबोली गावाच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत विश्वजीत महालिंगे हा कोणताही परवाना नसताना १८० मिलीच्या ५१ बाटल्या आणि ९० मिलीच्या ३७ बाटल्या अशा एकूण ५ हजार ५६० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याचे आढळले. तर गोनवडी गावाच्या हद्दीतील कारवाईत जीवन राजपूत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १७ लिटर सुमारे १ हजार ७०० रुपये किमतीची हातभट्टी दारू बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. Countryliquor

दोन्ही कारवायांमध्ये संबंधित चाकण एमआयडीसीत अवैधरित्या देशी दारू व हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली.मद्यसाठा जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत. Countryliquor

Chakantimes
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments