Homeराजकीय#Grampanchayatelection : ग्रामपंचायत खराबवाडीची सदस्य आरक्षण सोडत जाहीर.

#Grampanchayatelection : ग्रामपंचायत खराबवाडीची सदस्य आरक्षण सोडत जाहीर.

चाकण प्रतिनिधी दि.१२ –

ग्रामपंचायत खराबवाडी (ता.खेड) ची सन २०२६-२०३० या पंचवार्षिक निवडणूकीसाठी वॉर्डनिहाय सदस्य आरक्षण प्रक्रिया पार पडली.

ग्रामपंचायत खराबवाडीची सदस्य संख्या ही एकूण १७ आहे. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी ४ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९ जागा आरक्षित करण्यात आल्या.

वॉर्ड क्रमांक १ – अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला),

वॉर्ड क्रमांक २ – अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, सर्वसाधारण (महिला).

वॉर्ड क्रमांक ३ – अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण.

वॉर्ड क्रमांक ४ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण.

वॉर्ड क्रमांक ५ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण,

वॉर्ड क्रमांक ६ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण

असे आरक्षण जाहीर झाले आहे. 

या आरक्षण कार्यक्रमाप्रसंगी अध्याशी अधिकारी अक्षय कोरपे, ग्राममहसूल अधिकारी श्याम वालेकर, ग्रामपंचायत अधिकारी नीलिमा जाधव, पोलीस पाटील किरण किर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments