Homeक्राईम#midcpolice : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई.

#midcpolice : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई.

अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले.

चाकण प्रतिनिधी दि. ११ –

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अवैध हातभट्टी दारु विक्रीच्या अनाधिकृत असलेल्या झोपड्या किंवा पाल निष्कासन करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.

ह्या कारवाईमध्ये चाकण एमआयडीसीमधील कुरुळी, निघोजे, महाळुंगे इंगळॆ या तीन गावांमध्ये हातभट्टीची गावठी दारु विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. तेव्हा पोलिसांनी दारू विक्री करीत असलेल्या झोपड्या ह्या जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्या. सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईमध्ये –

१) दुरेश रमेश राठोड (सिग्मा चौक, महाळुंगे, ता.खेड जि.पुणे),

२) लखन हाजुरिया ठाकुर (डी.के.चौक कुरुळी, ता.खेड, जि.पुणे),

३) पुष्पादेवी शांतीलाल जाट (हिंदुस्थान पेट्रोल पंप तळवडे ब्रिज, निघोजे, ता.खेड, जि.पुणे),

४) लखन जडजा शिंदे (सिग्मा चौक, महाळुंगे, ता.खेड, जि.पणे)

अशा एकूण चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चाकण एमआयडीसी परिसरात पोलिसांकडून कारवाई.

पुणे येथील हडपसर व पिंपरी चिंचवड शहर कार्यक्षेत्रात फुगेवाडी, दापोडी परिसरात हातभट्टीची विषारी दारु पिल्याने २२ इसमांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची गंभीर घटना घडली होती. अशा स्वरुपाच्या घटनेची पुनरावृत्ती होवु नये व अवैद्य धंदयांचे समुळ उच्चाटण व्हावे. या दृष्टीने अवैद्य धंदे करणाऱ्या इसमांवर सक्त व परिणामकारक कारवाई पोलिसांकडून चाकण एमआयडीसी परिसरात करण्यात आली आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments