आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. Rajgurunagar

चाकण प्रतिनिधी दिनांक २ –
राजगुरुनगर येथे महाविद्यालयात जाण्यासाठी कुरकुंडी येथील बसस्थानकावर उभे असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यामध्ये भरधाव सफारी आणि स्कुटी धडकून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आदिती नवनाथ राळे (वय १९, रा. कुरकुंडी, ता.खेड) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघाताला दहा दिवस उलटूनही सफारी चालक फरार असून तपासाबाबत पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने कुरकुंडी ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने रस्ता रोको आंदोलन केले. आदिती राळेच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच शेकडो ग्रामस्थांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कुरकुंडी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. Rajgurunagar

आमदार बाबाजी काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, सुनीता शरद बुट्टे पाटील, खेड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंकुश राक्षे, बाजार समितीचे सदस्य अनुराग जैद, पंचायत समिती सदस्य सारिका गोगावले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष निलेश थिगळे तसेच आजी-माजी सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. Rajgurunagar
अपघातानंतर सफारीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी वाहनमालक विकास कराड यांना ताब्यात घेतले होते. मात्र, चालकाचा शोध लागलेला नसल्याने राळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी पोलिसांच्या तपासपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांकडून फिर्यादी कुटुंबीयांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनासमोर विविध मागण्या केल्या. पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे. तपास क्राईम बँचकडे सोपवावा. अपघातग्रस्त सफारीचा पंचनामा घटनास्थळीच का केला नाही? संबंधित सफारीमध्ये मतदारांना वाटण्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड असल्याचा आरोप आंदोलकांनी केला? पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. फरार चालकाला अटक होईपर्यंत वाहनमालक विकास हिरामण कराड यांना सहआरोपी करून चौकशी करावी. विधानपरिषदेचे पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचाराचे साहित्य संबंधित वाहनात असल्याचा दावा केला. यात राजकीय संबंध आहेत का, याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. आंदोलनामुळे दोन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंना पाच किलोमीटरपर्यंत बाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुढील दोन दिवसांचा अल्टिमेटम आंदोलकांनी दिला आहे. Rajgurunagar
पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गाडीमध्ये दोन कोटी रुपयांची रोकड असल्याचा आरोप आहे. तसेच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्यही त्या गाडीत होते. संबंधित उमेद्वाराला वाचविण्यासाठी पोलिसांनी मदत केली का, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
– अंकुश राक्षे, अध्यक्ष, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.
बैलपोळा, नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात डीजे चालकांकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसूल करतात, असे आरोप आहेत. मात्र, आदितीच्या अपघाताला दहा दिवस उलटूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अपघातानंतर आम्ही फाट्यावरील झाडे काढली. बसस्थानक बांधले आणि रस्त्यावर गतिरोधक बसवले. मग बांधकाम विभाग, पीएमआरडीए आणि पोलीस प्रशासनाने यापूर्वी काय केले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत.
-गणेश बोत्रे, सदस्य, जिल्हा परिषद,
आम्ही सर्वजण आदिती राळे यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांना योग्य न्याय मिळाला नाही, तर सर्व राजकीय पक्ष आपापले मतभेद बाजूला ठेवून मोठे जनआंदोलन उभे करतील. कोणत्याही परिस्थितीत राळे कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
– विजयसिंह शिंदे, गटनेते, पुणे जिल्हा परिषद.
हे ही वाचा.
चाकण_तळेगाव चौक पुन्हा जलमय.! नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी – वाहतूक कोंडीचा उद्रेक होण्याची शक्यता…
https://youtube.com/shorts/u5gb4LeZfjE?feature=share











