Homeक्राईमRajgurungar : राजगुरूनगरमध्ये मामाचा खून करून भाच्याने गळफास घेऊन केली आत्महत्या. 

Rajgurungar : राजगुरूनगरमध्ये मामाचा खून करून भाच्याने गळफास घेऊन केली आत्महत्या. 

राजगुरूनगरमधील धक्कादायक घटना. Rajgurungar

Rajgurungar

चाकण प्रतिनिधी दि.१९ –

राजगुरूनगरमध्ये मामा भाचाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आजारपणाच्या उपचारासाठी आलेल्या मामाची सख्या भाच्यानेच कोयत्याने वार हत्या करून स्वतः भाच्याने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संदीप वामन गडदे (वय ४३ वर्षे) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे तर प्रवीण कैलास कोहिणकर (वय २० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या भाच्याचे नाव आहे. Rajgurungar

खेड येथे आजाराच्या उपचारासाठी मुक्काम. 

सविस्तर माहिती अशी की, मयत संदीप गडदे हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. आजारपणाच्या उपचारासाठी मागील सुमारे दोन महिन्यांपासून राजगुरूनगर येथील माधवनगर परिसरात राहणाऱ्या कोहिणकर कुटुंबाच्या घरीच राहत होते. Rajgurungar

आधी हत्या, नंतर गळफास.

शनिवारी सकाळी अचानक प्रवीणने धारदार कोयत्याने संदीप गडदे यांच्या गळ्यावर प्राणघातक केला. त्यामध्ये गडदे यांचा जागीच मृत्यू होऊन रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला. मामाचा खून केल्यानंतर प्रवीणने स्वतःही घरात गळफास लावून आत्महत्या केली. Rajgurungar

आत्महत्येपूर्वीची सुसाईड नोट चर्चेत. 

सदर घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीणने लिहिलेली सुसाईड नोट हातात दिसून आली. या चिठ्ठीत त्याने “मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे,” असे लिहिले असल्याची बाब समोर आली. Rajgurungar

पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित?

प्रविणला मामापासून नेमका कोणत्या स्वरूपाचा त्रास होता? मामाच्या आजारपणामुळे कुटुंबात वाद सुरू होते का? कौटुंबिक किंवा आर्थिककारण होते का? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले आहे. खेड पोलिसांकडून सुसाईड नोटसह इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. Rajgurunagar

हे ही वाचा. 

दिलीप मोहितेंची पकड घट्ट होतेय…. सर्वाधिक प्रतिनिधी निवडून आल्याचा कार्यकर्त्यांचा दावा तर सातकर गटाचा बुरुज ढासळला.

https://rbpnews.com/news/diliip_mohitemchii_pkd_ghtt_hotey_srvadhik_prtinidhii_nivduun_aalyacha_karykrtyamcha_dava_

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments