Homeलोकल न्यूजन्यू होम मिनिस्टर : उद्योजक गणेश खराबी यांसकडून महिलांसाठी "खेळ रंगला पैठणीचा"...

न्यू होम मिनिस्टर : उद्योजक गणेश खराबी यांसकडून महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन.

उद्योजक गणेश खराबी यांसकडून महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन.

चाकण दि.२१ – युवा उद्योजक गणेश बाळासाहेब खराबी व सोनाली गणेश खराबी यांच्याकडून महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा” या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर “खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर, खराबवाडी (ता.खेड) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून विविध खेळांचा आनंद लुटला. तसेच पैठणी व घरगुती वापरातील बक्षीसे जिंकली.

या कार्यक्रमाप्रसंगी खेळ आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे, नाणेकरवाडी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, खेड पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, चाकण नगराध्यक्ष मनीषा सुरेश गोरे, पंचायत समिती सदस्य रूपाली कांबळे, माजी सभापती रामदास ठाकूर, नगरसेविका स्वाती लेंडघर, उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे, माजी उपसरपंच प्रकाश खराबी, हनुमंत कड, गोरक्षनाथ कड, अमृता खराबी, प्रवीण खराबी, हरीश खराबी, पत्रकार हनुमंत देवकर, मच्छिंद्र कड, किरण खराबी, प्रमोद देवकर, माजी सरपंच सागर खराबी, अर्जुन खराबी, दत्ता साठे व ग्रामस्थ उपस्थित होते.

* जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सिलिंग फॅन भेट.

सामाजिक उपक्रमांतर्गत युवा उद्योजक गणेश खराबी व सोनाली खराबी यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खराबवाडी यांना ११ सिलिंग फॅन भेट स्वरूपात देण्यात आले. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सचिन सोपान धाडगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

* खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला. बक्षीसे जिंकली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली. तेव्हा सर्वांचे मी, माझी पत्नी व माझ्या कुटुंबाकडून मनापासून आभार मानतो.

       * गणेश बाळासाहेब खराबी, युवा उद्योजक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments